logo

नांदुरा पोलिसांची डीजे वाहनावर कारवाई व ३२५०० रु. दंड वसूल

नांदुरा;- बुलढाणा जिल्हयात विनापरवाना डिजे वाजवुन सामाजिक, धार्मिक व ध्वनीचेही प्रदुषण करणा-या तसेच विवाह आणि मिरवणुकीत संवेदनशिल ठिकाणी विनाकारण थांबून कर्णकर्कश आवाजात डिजेच्या वादयावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्या जात असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत असल्याने व त्यातून सामाजिक सलोखा धोक्यात येऊन दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना जिल्ह्यामध्ये घडल्याने सदर घटनांना कुठेतरी आळा बसावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने यांनी सदर विनापरवाना डीजे विरुद्ध कार्यवाहीचे हत्यार उपसून मर्यादेपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या व परवाना नसणाऱ्या डीजेचे वाहनाविरुद्ध कारवाईचे आदेश जिल्ह्यातील ठाणेदार यांना दिल्याने नांदुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी विनापरवाना डीजे डॉल्बीच्या वाहनाविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू करून दि.०५.०५.२०२४ रोजी आपले अधिनस्त पोलीस अंमलदार यांचे सह गणि पेट्रोल पंप नांदुरा येथे आरोपी चालक-मालक नामे लोकेश दिनकर गोपाळ राहणार जळगाव खान्देश जिल्हा बुलढाणा याच्या ताब्यातील डीजे वाहन क्रमांक एम एच १४ जीडी ४०१४ ची पाहणी केली असता सदर वाहनांमध्ये जास्त उंचीचा डीजे साऊंड लावलेले तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे परवान्याचे उल्लंघन करून वाहनांमध्ये बदल केलेले दिसल्याने त्यास थांबवून ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे मोटार वाहन कायदा कलम ५२/१८२ A,१९८ प्रमाणे कार्यवाही करून मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना उचित कारवाई कामी अहवाल पाठविला असता त्यांनी सदर डीजे वाहनाविरुद्ध ३२५०० रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे .सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहायक फौजदार वानखडे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने साहेब ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री थोरात साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर श्री गवळी साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शना नुसार पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांनी केली असून भविष्यात सुद्धा नांदुरा पोलिसांचे वतीने अशाच विनापरवाना चालणाऱ्या डीजे डॉल्बी वाहनाविरुद्ध कठोर कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे.

176
7137 views